Accident News Sangli: देवदर्शनाहून परताना नागज फाट्याजवळ ट्रकला मोटारीची धडक; दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:27 PM2022-06-08T13:27:56+5:302022-06-08T13:40:07+5:30

भरधाव माेटार रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात माेटारीतील दाेघे ठार झाले, तर महिलेसह चालक गंभीर जखमी झाला.

Hit by truck near Nagaj Fateh in Kavthemahankal taluka; Two killed | Accident News Sangli: देवदर्शनाहून परताना नागज फाट्याजवळ ट्रकला मोटारीची धडक; दोन ठार

Accident News Sangli: देवदर्शनाहून परताना नागज फाट्याजवळ ट्रकला मोटारीची धडक; दोन ठार

googlenewsNext

ढालगाव : रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६ वर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शन करून कोल्हापूरला जोतिबा दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव माेटार रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात माेटारीतील दाेघे ठार झाले, तर महिलेसह चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. दाेघेही मृत माण (जि. सातारा) तालुक्यातील काळसकरवाडीचे आहेत.

आनंदराव शिवराम पवार (वय ६८) व माणिक साहेबराव पवार (६२) अशी मृतांची नावे आहेत, तर उषाताई आनंदराव पवार (५४) व माेटारचालक स्वप्नील आनंदराव पवार (२६) हे दाेघे गंभीर जखमी झाले.

काळसकरवाडी येथील पवार कुटुंब माेटार (क्र. एमएच ११ डीए ७६५८) घेऊन देवदर्शनासाठी निघाले हाेते. तुळजापूर व पंढरपूर येथे दर्शन घेऊन ते काेल्हापूरला जाेतिबा दर्शनासाठी निघाले हाेते. पंढरपूरमधून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर नव्यानेच झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरून ते काेल्हापूरच्या दिशेने निघाले हाेते. स्वप्नील पवार हा माेटार चालवित हाेता. दुपारी १ वाजण्याच्यादरम्यान त्यांची माेटार नागज फाट्याजवळ आली.

यादरम्यान कांदा घेऊन निघालेला ट्रक (क्र. एमएच २३ - ७२७०) रस्त्याकडेला उभा हाेता. भरधाव वेगाने येत असलेल्या पवार यांच्या माेटारीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागील बाजूला जाेरदार धडक दिली. अपघातात माेटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. माेटारीतील चाैघेही रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी झालेल्या आनंदराव पवार व माणिक पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदराव यांच्या पत्नी उषाताई व मुलगा स्वप्नील हे दाेघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी धावलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी पाठवून दिले. अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पाेलिसांचे पथक घटनास्थळी धावले. अपघातानंतर घटनास्थळी माेठी गर्दी जमल्याने वाहतुकीची काेंडी झाली हाेती. पाेलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, हवालदार सतीश आलदर, पोलीस विनोद चव्हाण यांनी पंचनामा केला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा अपघाताची नाेंद कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यात झाली.

Web Title: Hit by truck near Nagaj Fateh in Kavthemahankal taluka; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.