होलार समाजाचे विविध प्रश्न सोडविणार : रुपाली चाकणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 01:47 PM2021-06-08T13:47:03+5:302021-06-08T13:47:58+5:30
संजयनगर/ सांगली : होलार समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी,समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी, लवकरच राष्ट्रवादी कांग्रेसचे संस्थापक शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री ...
संजयनगर/ सांगली : होलार समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी,समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी, लवकरच राष्ट्रवादी कांग्रेसचे संस्थापक शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत चर्चा करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्याच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
सांगलीतील होलार समाजातर्फे होलार समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या निवासस्थानी रुपाली चाकणकर यांची सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी होलार समाजाचा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने चाकणकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात होलार समाज भुषण वि. दा. ऐवळे यांचे स्मारक सांगलीत उभारण्यात यावे आणि त्या स्मारकासाठी १००.कोटी निधी उपलब्ध करून द्यावा. चर्मकार महामंडळात होलार समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात यावे, होलार समाजाच्या ज्याठिकाणी चुकीच्या जाती नोंदी झाल्या आहेत होलार म्हणून दुरुस्ती करून द्याव्यात आणि होलार समाज अभ्यास आयोग नेमण्यात यावा, आदी अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रुपाली चाकणकर यांचा राजाराम ऐवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे, सागली जिल्हाध्यक्ष आनंदराव ऐवळे, शहर जिल्हाध्यक्ष दिपक हेगडे, महादेव कांबळे, दगडु ऐवळे, सिद्धेश्वर करडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.