अभाविपतर्फे सांगलीत परिपत्रकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:21+5:302020-12-05T05:04:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परीक्षांबाबत काढलेल्या परिपत्रकाची अखिल भारतीय ...

Holi of Sangli Circular by Abhavipa | अभाविपतर्फे सांगलीत परिपत्रकाची होळी

अभाविपतर्फे सांगलीत परिपत्रकाची होळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परीक्षांबाबत काढलेल्या परिपत्रकाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी सांगलीत होळी केली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष वैद्यकीय पदवीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात याव्यात, अशा सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दिल्या आहेत. तरीही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे या परीक्षा ७ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत. अद्याप प्रथम वर्ष वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

विद्यार्थी परिषदेचीसुद्धा हीच भूमिका आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करीत विद्यार्थी परिषदेने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली

यावेळी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, जिल्हा संयोजक जयदीप पाटील, विशाल जोशी, बाहुबली छत्रे, माधुरी लड्डा, रोहन भोरवत, रोहन कडोले, पुष्पक चौगुले, विश्वजित भोसले, दर्शन मुंदडा, अनुजा विभूते, ऋषिकेश पाटील, प्रणोती ढोले, सृष्टी कारंडे, विनीत लुगडे आदी उपस्थित होते

Web Title: Holi of Sangli Circular by Abhavipa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.