होळी स्पेशल रेल्वेला सांगली स्थानकावर थांबा, सांगलीतून कर्नाटक, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय
By अविनाश कोळी | Published: March 17, 2024 01:44 PM2024-03-17T13:44:08+5:302024-03-17T13:44:59+5:30
हुबळी-अहमदाबाद गाडी येत्या २४ मार्चला हुबळीतून रात्री साडे सात वाजता सुटून धारवाड, लोंढा, बेळगाव, घटप्रभा मार्गे सांगली स्टेशनवर २५ मार्चला पहाटे २:३७ वाजता पोहोचेल. २५ मार्चला पहाटे २:३७ वाजता सांगली ते अहमदाबाद विशेष रेल्वे गाडी (क्र. ०७३११)ची ४०० तिकीट उपलब्ध आहेत.
सांगली : हुबळी-अहमदाबाद व अहमदाबाद-हुबळी या होळी विषेश रेल्वेलासांगली स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीतून कर्नाटक व गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.
हुबळी-अहमदाबाद गाडी येत्या २४ मार्चला हुबळीतून रात्री साडे सात वाजता सुटून धारवाड, लोंढा, बेळगाव, घटप्रभा मार्गे सांगली स्टेशनवर २५ मार्चला पहाटे २:३७ वाजता पोहोचेल. २५ मार्चला पहाटे २:३७ वाजता सांगली ते अहमदाबाद विशेष रेल्वे गाडी (क्र. ०७३११)ची ४०० तिकीट उपलब्ध आहेत. गाडी सांगलीतून सुटून सातारा, पुणे, कल्याण(मुंबई), वसई(मुंबई), बोईसर, वापी, सुरत, वडोदरा, आनंद या मार्गावरुन अहमदाबादला जाईल.
परतीच्या प्रवासात २५ मार्चला रात्री ९:२५ वाजता अहमदाबाद वरून गाडी (क्र. ०७३१२) सुटेल. आनंद, वडोदरा, सुरत, वापी, बोईसर, कल्याण(मुंबई), वसई(मुंबई), पुणे, सातारा येथे थांबून सांगलीत दुपारी १२:५०वाजता पोहोचेल. सांगलीतून निघून घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड येथे थांबून हुबळीला संध्याकाळी ७:४५ वाजता पोहोचेल.
स्लीपर, वातानुकुलीत बोगींचा समावेश
गाडीला स्लीपर व एसी स्लीपरचे डब्बे असून ऑनलाईन आरक्षण www.irctc.co.in वेबसाईटवर सुरू झाले आहे. सांगली स्टेशन किंवा सांगलीतील अधिकृत एजंटकडे देखील तिकीट मिळेल.