होम आयसोलेशन रुग्णांवर लक्ष हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:13+5:302021-04-20T04:28:13+5:30
---------------- गावात दक्षता समित्यांनी दक्ष व्हावे सांगली : गतवर्षी कोरोनाकाळात गावागावातील दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम केले. यामुळे कोरोनाचे संकट ...
----------------
गावात दक्षता समित्यांनी दक्ष व्हावे
सांगली : गतवर्षी कोरोनाकाळात गावागावातील दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम केले. यामुळे कोरोनाचे संकट रोखण्यात यश आले होते. सध्या कोरोनाचे संकट वाढत असतानाही काही गावातील दक्षता समित्या सोडल्या तर अन्य ठिकाणी उत्साह दिसून येत आहे. यामुळे सर्वच गावांमध्ये दक्षता समित्यांनी दक्ष होऊन काम करण्याची गरज आहे.
----------------------
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
सांगली : ऑनलाईन बँकिंग व्यवहार, विविध वस्तूंची खरेदी यामध्ये नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे अशी फसवणूक थांबविण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता घ्यावी. शिवाय बँकिंग व्यवहारांबाबत सर्व बँकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
------------------
बचत गटांना आधार मिळावा
सांगली : कोरोनाच्या संकटात अनेक बचत गटांना त्यांची उत्पादने कुठे विकावीत याची समस्या आहे. यातच अनेक गटांनी बँकांचे कर्ज काढले आहे. यामुळे बचत गटांना वस्तूंची विक्री करता यावी अथवा बँक कर्जाच्या हप्त्यांबाबत योग्य ते धोरण ठरवावे अशी मागणी होत आहे.
-----------------------------
चाऱ्याचे नियोजन करावे लागणार
कडेगाव : उन्हाचा जोर वाढत असल्याने माळरानावर चराऊ गवत वाळत आहे. कडेगाव तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढल्याने जनावरांसाठी पोषक चाऱ्याची मुबलक व्यवस्था नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध माध्यमातून उन्हाळ्यात चाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
-----------------------
मुलांसाठी विविध उपक्रमांची गरज
सांगली : कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. अशावेळी मुलांकडे मोठ्या प्रमाणात वेळ आहे. अशावेळी त्यांच्यासाठी शाळा व सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, हस्ताक्षर प्रशिक्षण, वैज्ञानिक प्रयोग यासह विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे.
--------------------------
बुधवारी व रविवारी मटण दुकाने बंद
सांगली : महापालिका क्षेत्रात बुधवार दि. २१ रोजी व रविवार दि. २५ रोजी मटण, चिकन दुकाने, कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या दोन्ही दिवशी अनुक्रमे श्री रामनवमी व महावीर जयंती आहे.