आष्ट्यात श्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोरोना योद्ध्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:44+5:302021-06-22T04:18:44+5:30
श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अमीर फकीर, प्रदीप पाटील, डॉ. एन. डी. सांगले, डॉ. प्रकाश ...
श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अमीर फकीर, प्रदीप पाटील, डॉ. एन. डी. सांगले, डॉ. प्रकाश आडमुठे यांनी लखन लोंढे, शकील मुजावर, भरत काटकर, सचिन मोरे यांचा गौरव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आष्टा शहरातील हिंदू स्मशानभुमी व मुस्लीम समाज कब्रस्थानमध्ये कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी लखन लोंढे, संजय भंडारे, योगेश कांबळे, अरुण टोमके, भरत काटकर, शकील मुजावर, आरिफ फकीर, अझरुद्दीन मुजावर, हाजी साजिद मुलानी, कलंदर मुजावर, इसाक मुजावर, पालिकेचे अधिकारी सचिन मोरे, सागर कोळी, हिम्मत कोळी, भरत काटकर यांच्यासह मान्यवरांचा गौरव संस्थापक प्रदीप पाटील, आमिरखान फकीर, डॉ. प्रकाश आडमुठे, सचिन दमामे-पाटील, डॉ. एन. डी. सांगले, अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अमीर फकीर म्हणाले, ‘‘श्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना आणखी उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळते.’’
शकील मुजावर म्हणाले, ‘‘संस्थेने हिंदू-मुस्लीम समाजातील युवकांच्या कामाचे कौतुक करून त्यांना लढण्याची प्रेरणा दिली आहे. डॉ. प्रकाश आडमुठे यांनी कोरोनाबाबत कशाप्रकारे दक्षता घ्यावी, याची माहिती दिली.