बैलजोडी जीवापाड जपणाऱ्या शेतकऱ्याचा पेठ येथे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:25+5:302021-07-23T04:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे बेंदूर सण उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी आत्मशक्ती शिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे बेंदूर सण उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी आत्मशक्ती शिक्षण संस्थेच्या हंसाजीराव बळवंतराव पाटील हायस्कूलच्यावतीने वेगळा उपक्रम राबविण्यात आला. बैलजोडी जीवापाड जपणारे शेतकरी महावीर गुजले यांना गौरविण्यात आले.
पेठ गावातील जिगरबाज शेतकरी महावीर आनंदा गुजले यांनी राजा आणि सर्जा या बैलजोडीचा जीवापाड सांभाळ केला आहे. या बैलजोडीला घरातील सदस्य असल्यासारखी वागणूक दिली जाते. आत्मशक्ती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी गुजले यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अभिजित पाटील, शेखर बोडरे, शशिकांत जाधव, नामदेव भांबुरे, संजय कांबळे, महेबूब सदे, सुनील बनसोडे उपस्थित होते. यावेळी या दोन्ही बैलजोडींचे पूजन मंदाकिनी बोडरे यांच्या हस्ते करण्यात आले.