विट्यात रोटरीच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:13+5:302021-07-03T04:18:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोनाच्या महामारीत अखंडितपणे सेवा बजावणाऱ्या विटा शहरातील डॉक्टर, तसेच कोविड योद्धांसह चार्टर्ड अकौंटंट यांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोनाच्या महामारीत अखंडितपणे सेवा बजावणाऱ्या विटा शहरातील डॉक्टर, तसेच कोविड योद्धांसह चार्टर्ड अकौंटंट यांचा विटा रोटरी क्लबच्यावतीने सन्मान करण्यात आला. विटा रोटरी क्लबचे संस्थापक किरण तारळेकर, अध्यक्ष रोहित दिवटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. विशाल नलवडे, डॉ. प्राणसिंग राजपूत, डॉ. विशाल ठोंबरे, डॉ. अभिजित निकम, डॉ. दीपाली पाटील, डॉ. नीलम मणेर, डॉ. वृषाली शिंदे, तसेच चार्टर्ड अकौंटंट सचिन आबदर, आक्रम शिकलगार, शक्ती पवार यांचा सन्मान झाला.
रोहित दिवटे यांनी कोरोनाकाळातील डॉक्टरांच्या कार्याची दखल रोटरीने घेतली असल्याचे सांगितले. डॉ. अनिल लोखंडे, डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. विशाल नलवडे यांनी ग्रामीण रिग्णालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोविड लसीकरण, चाचण्या, विलगीकरण, उपचार याबाबत माहिती दिली.
यावेळी सागर म्हेत्रे, कुलदीप बाबर, डॉ. अमोल तारळेकर, डॉ. सुशांत वलेकर, डॉ. गौरव पावले, सुरेश म्हेत्रे, सुशांत भागवत, संजय भस्मे, प्रफुल्ल निवळे, विक्रम जैन, विक्रम आहुजा आदी उपस्थित होते.