आष्ट्यात जायंट्सच्या वतीने महिला शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:21+5:302021-01-08T05:27:21+5:30
आष्टा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जायंट्स ग्रुप, आष्टा व जायंट्स सहेली यांच्यावतीने शिक्षिका सन्मान दिन म्हणून ...
आष्टा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जायंट्स ग्रुप, आष्टा व जायंट्स सहेली यांच्यावतीने शिक्षिका सन्मान दिन म्हणून साजरी करण्यात आली.
येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय आणि लठ्ठे अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आष्टा शहरातील विविध शाळांमधील ७० महिला शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. स्मिता मुलाणी यांनी ‘व्हय मी सावित्री बोलते !’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी तत्कालीन काळातील स्त्रियांवर होणारे अन्याय तसेच सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याबद्दल परखड मते मांडली.
पर्यवेक्षक अनिल जगदाळे यांनी स्वागत केले. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष समीर गायकवाड, प्रा. सूर्यकांत जुगदर, आर. आर. उंटवाल, प्रा. दत्तात्रय सोकाशी, सिराज मुजावर, प्रा. सोमनाथ माळी, सहेलीच्या अध्यक्ष स्नेहा लिमये, मयुरी कुलकर्णी यांनी प्रतिमा पूजन केले. सर्व महिला शिक्षकांना गौरवण्यात आले. यावेळी समीर गायकवाड, प्रा. सूर्यकांत जुगदर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. स्नेहल आडमुठे यांनी सूत्रसंचालन केले. केबीपी इंग्लिश मीडियम स्कूल, बी. के. चौगुले माध्यमिक विद्यालय, बचपन स्कूल, प्राथमिक शाळा क्रमांक १२, महात्मा गांधी विद्यालय आणि लठ्ठे अध्यापक विद्यालयामधील शिक्षिका उपस्थित होत्या.
फोटो : ०५ आष्टा २
ओळ : आष्टा येथे समीर गायकवाड, स्नेहा लिमये, स्मिता मुलाणी, सूर्यकांत जुगदर, सिराज मुजावर, आर. आर. उंटवाल, स्नेहल आडमुठे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.