पाठक अनाथाश्रमाच्या गृहमाता कुलकर्णी यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:28+5:302021-03-09T04:29:28+5:30
मिरजेतील पाठक अनाथाश्रमातील गृहमाता सरोजिनी कुलकर्णी यांचा सत्कार जेरी पिंटो यांनी केला. यावेळी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. लोकमत न्यूज ...
मिरजेतील पाठक अनाथाश्रमातील गृहमाता सरोजिनी कुलकर्णी यांचा सत्कार जेरी पिंटो यांनी केला. यावेळी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : येथील पाठक अनाथाश्रम व वृद्धाश्रमाच्या माजी कर्मचारी श्रीमती सरोजिनी कुलकर्णी यांचा सत्कार महिला दिनानिमित्त करण्यात आला. जेरी पिंटो यांनी स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन कुलकर्णी यांच्या निरपेक्ष सेवेला गौरविले. यावेळी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कुलकर्णी यांनी पाठक अनाथाश्रमात २५ वर्षे गृहमाता म्हणून काम केले. अनेक निराधार अर्भकांना मातेची ऊब दिली. अनाथ मुलांवर मातेच्या ममतेने संस्कार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अनाथ मुले शिक्षण पूर्ण करुन स्वावलंबी झाली. मुलींना गृहकृत्यदक्ष बनविले. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने अनाथ मुलांना दत्तक पालक मिळाले. त्यांच्या कामगिरीचा गौरव महिला दिनाच्या निमित्ताने झाला. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरुनच संस्थेची वाटचाल सुरु असल्याची भावना संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.