आशा वर्कर्सचे प्रश्न तातडीने सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:12+5:302021-03-21T04:25:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आशा वर्कर्सचे मानधन वाढ आणि आरोग्यविषयक प्रश्न तातडीने सोडवण्यात येणार असून, येत्या महासभेत याबाबतचा ...

Hope to solve the problems of the workers immediately | आशा वर्कर्सचे प्रश्न तातडीने सोडवू

आशा वर्कर्सचे प्रश्न तातडीने सोडवू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आशा वर्कर्सचे मानधन वाढ आणि आरोग्यविषयक प्रश्न तातडीने सोडवण्यात येणार असून, येत्या महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.

पंचशीलनगरमधील श्रीराममंगलम परिवाराच्यावतीने साफसफाई कामगार, आरोग्य कर्मचाऱ्यांचा व स्टोकिस्ट ऑर्डर बॉय यांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा मोफत विमा करून देण्यात आला. यावेळी महापौर बोलत होते. महापौर सूर्यवंशी यांच्या हस्ते यावेळी परिसरातील डॉक्टर्स, महानगरपालिकेचे आरोग्यसेवक, आशा वर्कर्स, होलसेल औषध दुकानांमध्ये काम करणारे सेल्समन यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महापौरांनी या उपक्रमाचे कौतुक करून इतर संस्था आणि संघटनांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक सोनू गवळी यांनी केले. डी. एस. माने यांनी निवेदन केले.

कार्यक्रमास अर्चना सूर्यवंशी, समिता पाटील, सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे, संघटक सचिव संदीप पाटील, महापालिका आरोग्य अधिकारी वैशाली पाटील, मंडळाचे अध्यक्ष सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

Web Title: Hope to solve the problems of the workers immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.