काँग्रेस-राष्ट्रवादीकडून घोडेबाजार : दीपक शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:28 AM2021-02-24T04:28:54+5:302021-02-24T04:28:54+5:30
विरोधकांकडून घोडेबाजार, महापौरपदाला काळिमा महापौर, उपमहापौर निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीने घोडेबाजार केला. भापजच्या सात नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून फोडले. हा ...
विरोधकांकडून घोडेबाजार, महापौरपदाला काळिमा
महापौर, उपमहापौर निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीने घोडेबाजार केला. भापजच्या सात नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून फोडले. हा महापौरपदाला काळिमा आहे. फुटीर नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवणार आहोत. महापौर, उपमहापौर पदे गेली तरी महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. स्थायी समिती सभापती व अन्य समित्या आमच्या ताब्यात आहेत. विरोधकांच्या कारभारांवर वॉच ठेवणार असून ऐनवेळचे विषय, आरक्षणाचा बाजार होऊ देणार नाही.
- दीपक शिंदे म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
कोट
महापौर निवडीत जे झाले, ते चांगले झाले नाही. तरीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा. फुटीर सात नगरसेवकांबाबत पक्ष निर्णय घेईल.
- सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
कोट
लोकमताचा अनादर करून भाजपमधीलच काही लोकांनी विरोधात जाऊन मतदान केले. हा धनशक्तीचा विजय आहे. फुटीर नगरसेवकांवर काय कारवाई करायची याचा निर्णय पक्षाचे नेते दोन दिवसांत एकत्र बसून घेतील.
- विनायक सिंहासने, गटनेते, भाजप
चौकट
‘लोकमत’चा अंदाज खरा ठरला
सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे असलेल्या संख्याबळाबाबत दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने बातमी दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ३९, तर भाजपकडे ३६चे संख्याबळ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. प्रत्यक्ष निवडीवेळी हेच संख्याबळ कायम राहिल्याने ‘लोकमत’चा अंदाज खरा ठरला.