आयुक्तांकडून वृक्षारोपण कार्यक्रम हायजॅक
By admin | Published: July 1, 2016 11:48 PM2016-07-01T23:48:13+5:302016-07-01T23:53:47+5:30
बालाजीनगरमध्ये मोहीम : महापालिका पदाधिकारी येण्यापूर्वी वृक्षारोपण आटोपले
सांगली : वन महोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्यावतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी हायजॅक केला. पालिकेच्या कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती यांना निमंत्रण देण्यात आले. पण ते येण्यापूर्वीच वृक्षारोपण करून ‘प्रोटोकॉल’ला हरताळ फासला. पालिका प्रशासनाच्या या अतिउत्साही कारभाराबद्दल नगरसेवकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
वन महोत्सवानिमित्त महापालिकेच्यावतीने सांगलीतील बालाजीनगर व मिरजेतील मिरज ओढा येथे वृक्षारोपणाचा अधिकृत कार्यक्रम आयोजित केला होता. महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, वृक्ष समितीच्या सदस्यांना शुक्रवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे निमंत्रण प्रशासनाने दिले होते. बालाजीनगर येथील कार्यक्रमाची जय्यत तयारीही प्रशासनाने केली होती. त्यासाठी खुद्द सभापती संतोष पाटील यांनी मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या प्रभागातील एका कामावरील जेसीबी बालाजीनगर येथे पाठवून १६० खड्डे काढण्यात आले. पण शुक्रवारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमावेळी वेगळाच अनुभव आला. आयुक्त खेबूडकर यांनी साडेनऊच्या सुमारास आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला.
पण महापालिकेचा कार्यक्रम असल्याने प्रोटोकॉलनुसार पदाधिकारी उपस्थित आहेत की नाही, याचीही दखल आयुक्तांनी घेतली नाही. महापौर, उपमहापौरांना दहा वाजताचे निमंत्रण होते. तत्पूर्वीच वृक्षारोपण करण्यात आले. दहा वाजण्यापूर्वी स्थायी समिती सभापती संतोष पाटील कार्यक्रमस्थळी आले. त्यानंतर अगदी पाच मिनिटात उपमहापौर विजय घाडगेही तिथे पोहोचले. पण तत्पूर्वीच दहा ते पंधरा रोपे लावली गेली होती. या प्रकाराने पदाधिकारी अचंबित झाले. किमान प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी तरी प्रोटोकॉल पाळण्याची गरज होती. पण त्यांनी हरताळ फासल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

नगरसेवकांत नाराजी
महापालिकेचा कार्यक्रम महापौर, उपमहापौर यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे. आमदार, खासदारापेक्षाही महापौरांचा मान मोठा असतो. पण खुद्द आयुक्तांनीच त्याला हरताळ फासल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे. उपमहापौर विजय घाडगे हे तर वृक्ष समितीचे सदस्यही आहेत. पण तेही कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच वृक्षारोपण झाले होते. यासंदर्भात आयुक्त खेबूडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद होता.