तासगावला वेध आरक्षणाचे

By admin | Published: September 30, 2016 11:37 PM2016-09-30T23:37:43+5:302016-10-01T00:20:04+5:30

नगरपालिका निवडणूक : शासनाने मागविली नगरपालिकांकडून माहिती

Hourly perforation review | तासगावला वेध आरक्षणाचे

तासगावला वेध आरक्षणाचे

Next

दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाने स्पष्ट झाले आहे. निवडणूक तोंंडावर आल्याने इच्छुकांना नगराध्यक्ष आरक्षणाचे वेध लागले आहेत. शासनाकडून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींची लोकसंख्या आणि सध्याच्या आरक्षणाची पडताळणी करण्यात आली आहे. सर्वच नगरपालिकांकडून त्याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच आरक्षण जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तासगाव नगरपालिकेत यावेळी नगरसेवकांच्या दोन जागा वाढलेल्या आहेत, तर नगराध्यक्ष पदाची निवड यावेळी नगरसेवकांतून करण्याऐवजी थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रभाग रचना आणि नगरसेवक पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र अद्याप नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या फडात अद्यापही शांतता आहे. पालिकेवर वर्चस्व असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीतील पहिल्या फळीत बहुतांश नेत्यांना नगराध्यक्ष पदाची आशा आहे. त्यामुळे प्रभागात या इच्छुकांचे लक्ष लागत नसल्याचेही चित्र आहे.
राज्य शासनाकडून नुकतीच राज्यातील नगरपालिकांकडून विद्यमान आरक्षणाबाबतची माहिती मागविण्यात आलेली आहे. या माहितीबरोबरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या माहितीबाबतही पडताळणी करण्यात येत आहे. शासनाकडून माहिती मागवण्यात आल्यामुळे शासनपातळीवरुन नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच आरक्षण सोडत जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

थेट नगराध्यक्ष : निवड ठरणार डोकेदुखीच
तासगाव नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत गटबाजी सातत्याने दिसून येत आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पालिकेतील राजकीय समीकरणे आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहेत.


अंतिम यादी १५ आॅक्टोबरला
राज्य निवडणूक आयोगामार्फत नगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. नगरपालिकेकडून प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ७ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत, तर प्रभागनिहाय यादी अंतिम करुन १५ आॅक्टोबररोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Web Title: Hourly perforation review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.