जिल्हाधिकारी कार्यालयात रंगला मन परिवर्तनाचा तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:26 PM2017-10-04T23:26:42+5:302017-10-04T23:26:42+5:30

Hours of change in color at the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयात रंगला मन परिवर्तनाचा तास

जिल्हाधिकारी कार्यालयात रंगला मन परिवर्तनाचा तास

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मानवी जीवनात कामाबरोबर ताण-तणाव असतो. त्यातून विचारात साचेबद्धपणा येतो. या गोष्टींवर मात करायची असेल, तर सर्वात आधी मन परिवर्तन करा. त्यातून तुमची यशाकडे वाटचाल होते, असे प्रतिपादन इंटरनॅशनल मार्इंड एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कोरियातील संचालक सो जे हयो यांनी केले. त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मन परिवर्तनाचा सल्लाही दिला.
इंटरनॅशनल मार्इंड एज्युकेशन इन्स्टिट्यूट या कोरियन संस्थेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना मन परिवर्तनाच्या आणि सकारात्मक विचारबदलाच्या प्रक्रियेबद्दल, तसेच त्यासाठी संस्था आयोजित करीत असलेल्या कार्यशाळेची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी असा प्रातिनिधिक कार्यक्रम घेण्याची विनंती त्यांनी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी तात्काळ होकार देत या कार्यक्रमाचे आयोजन केले.
‘ए चेंज्ड् मार्इंड, ए चेंज्ड् सिटी’ ही संकल्पना घेऊन, इंटरनॅशनल मार्इंड एज्युकेशन इन्स्टिट्यूट मन परिवर्तनाचे धडे देते. त्याच माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम प्रत्येकाला आपला वाटावा, यासाठी कार्यक्रमाचा प्रारंभ कोरियन चमूतील युवक-युवतींनी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’, या प्रत्येकाच्या मनातील भाषेतील गीतांनी केला. त्यामुळे सुरुवातीलाच भाषेचा अडसर येणार नाही, याची प्रत्येकाला खात्री पटली.
अधिकारी व कर्मचारी यांच्या मनात या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता होती. संचालक सो जे हयो यांनी मानवीय जीवनात मनाच्या अवस्था, सकारात्मक विचाराचे महत्त्व, नकारात्मक मन बदलण्याची इच्छाशक्ती, मन आणि विचार परिवर्तनातून यशाकडे वाटचाल, अडथळे आणि समस्या संधी म्हणून स्वीकारण्याची दृष्टी, सुदृढ मनाची गरज, अडचणींवर मात करण्याची जिद्द, सकस आहाराबरोबरच सकस विचारांची गरज याबद्दल सादरीकरण केले. कोरियाच्या आर्थिक विकासाचा वेध घेत त्यांनी ह्युंदाई समूह, बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डन, सॅमसंग कंपनी, जगातील गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सलग १२ वर्षे विक्रम नोंदविणारे आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट विक्रेता (सेल्समन) जो सॅम्युएल गिरार्ड अशा विविध दाखल्यांतून समोरील व्यक्तीचे विचार लक्षपूर्वक ऐकून सकारात्मक परिवर्तन कसे घडवायचे, याबद्दल कोरियन भाषेतून विचार व्यक्त केले. यावेळी प्राजक्त पन्हाळकर यांनी दुभाषकाची भूमिका बजावली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, संस्थेचे महाराष्ट्रातील संचालक दक मान थांग, पुणे येथील संचालक सो मिन वु, उदयराज पौंडेल, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्हाधिकाºयांनी कोरियन भाषेतून मानले आभार
जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी या कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व सांगितले. समारोपप्रसंगी त्यांनी कोरियन भाषेतून ऋण व्यक्त केले. काही तरी वेगळा सकारात्मक विचार घेऊन काम करण्याची ऊर्जा हा कार्यक्रम देऊन गेला. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’, हा मूलमंत्र घेऊन कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्ती बाहेर पडेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Web Title: Hours of change in color at the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.