सांगलीत निवृत्त पोलिसाचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:51+5:302021-03-25T04:25:51+5:30
सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या विठ्ठलनगर येथील निवृत्त पोलिसाचे घर फोडून चोरट्यांनी ५० हजारांचा ऐवज लंपास केला. यात ...
सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या विठ्ठलनगर येथील निवृत्त पोलिसाचे घर फोडून चोरट्यांनी ५० हजारांचा ऐवज लंपास केला. यात पोलीस कामगिरी बजावल्याबद्दल मिळालेले राष्ट्रपती पदकही चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणी अनिता बाबासाहेब माने (वय ५३) यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी माने यांचे पती बाबासाहेब माने पोलीस दलात कार्यरत होते. बुधवार दि. १७ मार्च रोजी माने कुटुंबीयासह परगावी गेले होते. मंगळवार सायंकाळपर्यंत घर बंदच होते. घरी कोणी नसल्याचे संधी साधून चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला व आतील कपाटातील एक तोळ्याचे गंठण, चांदीचे पान, सुपारी, जास्वंदीचे फूल, निरंजन यास त्यांच्या मुलाचा पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्डसह बँकेची कागदपत्रे लंपास केली. यास पाेलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरीबद्दल फिर्यादीच्या पतींना मिळालेले राष्ट्रपती पदक आणि पोलीस पदकही चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. माने यांनी पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.