शेतकऱ्यांनी पाणीयोजना चालवायच्या कशा?: जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:53 PM2019-05-20T18:53:12+5:302019-05-20T18:54:16+5:30
इस्लामपूर : राज्य सरकारने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल पाचवेळा विजेचे दर वाढविल्यामुळे सामान्य ग्राहक, व्यावसायिकांसह शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ...
इस्लामपूर : राज्य सरकारने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल पाचवेळा विजेचे दर वाढविल्यामुळे सामान्य ग्राहक, व्यावसायिकांसह शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांनी स्वत:च्या हिमतीवर शेतीला पाणी देण्यासाठी उभारलेल्या पाणीपुरवठा योजना कशा चालवायच्या? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
भडकंबे येथे नागरिकांसमवेत पाटील यांनी बैठक घेऊन विविध प्रश्नांचा आढावा घेतला. याप्रसंगी राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, पूर्वी गावातील पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल लाख-दीड लाख येत असेल, तर आता ते तीन लाखाच्या वर गेले आहे. हा शेतकºयांंना मोठा भुर्दंड आहे. आपले विरोधक येत्या विधानसभेस सर्व मार्गांचा अवलंब करू शकतात. मात्र माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. आपण एकदा ताकदीने मैदानात उतरला, तर कोणतीही ताकद आपल्यासमोर टिकू शकत नाही