संजयकाकांची तासगावात भाजपला किती मदत ?

By admin | Published: December 29, 2016 11:46 PM2016-12-29T23:46:33+5:302016-12-29T23:46:33+5:30

अजितराव घोरपडे : अप्रामाणिक कोण हे कळेलच!

How much support for BJP in the hours of Sanjayakak? | संजयकाकांची तासगावात भाजपला किती मदत ?

संजयकाकांची तासगावात भाजपला किती मदत ?

Next


मिरज : भाजपशी प्रामाणिक असल्याचा आव आणणाऱ्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत केली असती तर तासगावात मी निवडून आलो असतो. पक्षाशी प्रामाणिक कोण व अप्रामाणिक कोण, हे थोड्या दिवसांत कळेल. त्यासाठी थांबा व पाहा! राष्ट्रवादीसोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविणाऱ्यांनी मी अप्रामाणिक आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, अशा शब्दात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी खा. संजयकाका पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे भाजपशी अप्रामाणिक असल्याचा व ते राष्ट्रवादीला मदत करीत असल्याचा आरोप खा. संजयकाका पाटील यांनी बुधवारी केला होता. त्यावर घोरपडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ही राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा बँकेची निवडणूक लढविणाऱ्यांनी, मी राष्ट्रवादीच्या भल्यासाठी धडपड करीत असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीच्या मदतीने निवडणूक लढविण्याचा प्रकार सुरू करणाऱ्यांना इतरांनी राजकीय सोयीसाठी असे केले तर का झोंबते?
ते म्हणाले की, पक्षाशी प्रामाणिक असल्याचा दावा करणाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत केली असती तर, मी निवडून आलो असतो. मात्र, मी रडत बसणार नाही. पक्षाशी प्रामाणिक कोण व अप्रामाणिक कोण, हे थोड्याच दिवसांत कळेल. त्यासाठी थांबा व पाहा! पक्षातील अप्रामाणिक कोण आहे, हे भाजपच्या अध्यक्षांना विचारा. ाी अजून बोललेलो नाही, मात्र प्रामाणिकपणाचा दावा करणाऱ्यांनी पक्षाविरोधात केलेली कृत्ये लपणार नाहीत. पक्षात प्रामाणिक व अप्रामाणिक असल्याचे लेबल देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?
ढालगाव येथील मेळाव्यासाठी मला निमंत्रण दिले आहे की नाही, हे माहीत नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मी सर्वसामान्यांसाठी काम करतो, त्यात कोणीही अडथळा आणू नये, अशी अपेक्षा आहे. मात्र काहीही बोलणाऱ्यांना कोण आवरणार? आम्ही कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रतीक्षा करीत बसलो नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कवठेमहांकाळ तालुक्यात उमेदवार निवडीबाबत आपल्याला विश्वासात घेतले जाईल, असे वाटत नाही, असेही घोरपडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: How much support for BJP in the hours of Sanjayakak?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.