लसटंचाईमुळे १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाचा गोवर्धन कसा पेलायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:16+5:302021-04-28T04:28:16+5:30

सांगली : जिल्ह्यात १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. सध्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणामध्ये लसीअभावी प्रचंड ...

How to vaccinate everyone above 18 years of age due to vaccination? | लसटंचाईमुळे १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाचा गोवर्धन कसा पेलायचा?

लसटंचाईमुळे १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाचा गोवर्धन कसा पेलायचा?

Next

सांगली : जिल्ह्यात १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. सध्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणामध्ये लसीअभावी प्रचंड अडथळे येत आहेत, त्यामुळेत १८ वर्षांवरील लसीकरणाचा डोंगर कसा पेलणार? हा मोठा प्रश्न आहे.

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सध्या वेगाने सुरू आहे. २६७ केंद्रांवर दररोज सकाळी आठ वाजल्यापासूनच रांगा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असताना प्रशासनाकडून मात्र नियोजन होत नसल्याचा अनुभव आहे. दररोज सरासरी २५ हजार जणांना लस टोचली जात आहे, पण तितकी लस उपलब्ध होत नाही. एक दिवसाआड ४० ते ५० हजार मात्रा मिळतात, त्या संपताच लसीकरण ठप्प होते. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक झळकतात.

नागरिकांचा कल शासकीय केंद्रांवर विनामूल्य लस घेण्याकडे आहे. खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत उपलब्ध असली तरी तेथे प्रतिसाद नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच महापालिकेच्या शहरी आरोग्य केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. तेथे नियोजनाअभावी अनागोंदी आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक केंद्रांत जागेअभावी लसीकरण आणि कोरोना चाचणी एकाच छताखाली सुरू आहे, त्यातून नव्याने कोरोना संसर्गाचा धोका आहे.

पॉइंटर्स

सध्या सुरू असलेली केंद्रे - २६७

जिल्ह्यात एकूण लसीकरण केंद्रे - ३७७

दररोज लस देण्याचे टार्गेट - २५ हजार

प्रत्यक्ष दिली जाणारी लस - २० हजार

आतापर्यंत टार्गेट पूर्ण - ७७ टक्के

१. १ मे पासून १८ वर्षांवरील साडेसतरा लाख तरुणांना लस देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आणखी १०० लसीकरण केंद्रे नव्याने सुरू केली जाणार आहेत.

२. कोविन पोर्टल किंवा सेतू ॲपवर नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिवस, वेळ अशी अपॉइन्टमेन्ट मिळणार आहे, त्याच वेळेस लाभार्थ्याने लसीकरणासाठी यायचे आहे. त्यामुळे केंद्रावर झुंबड उडणार नाही अशी अपेक्षा आहे.

३. लसीचा तुटवडा ही मोठी समस्या आरोग्य यंत्रणेपुढे आहे. जिल्हा परिषदेकडे साठा करण्याची व्यवस्था आहे, पण दररोज किमान ५० हजार मात्रा मिळाल्या तरच लसीकरण अखंडित सुरू राहणार आहे.

चौकट

१ मे नंतरचे नियोजन

- १ मेपासून लसीकरणासाठी आणखी केंद्रे वाढविण्याचे नियोजन आहे. सध्याची प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तसेच महापालिकेची शहरी आरोग्य केंंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील.

- महापालिका क्षेत्रात १४ लसीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत. परिचारिका, समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची भरती सुरुू आहे. प्रत्येक प्रभागात एका केंद्राचे नियोजन आहे. महापालिका शाळांच्या शिक्षकांनाही मदतीला घेतले जाणार आहे.

कोट

१८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी आणखी १०० लसीकरण केंद्रे जिल्हाभरात वाढविण्याचे नियोजन आहे. वाढती गरज पाहून दोन लाख लसींच्या मात्रांची मागणीही केली आहे. सध्याच्या गर्दीवर नियंत्रणासाठी तसेच लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी कुपन पद्धती लागू केली आहे. १ मे पासूनचे लसीकरण पूर्वनोंदणीनुसार होणार असल्याने गर्दी नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे.

- डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी

Web Title: How to vaccinate everyone above 18 years of age due to vaccination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.