रेल्वेकडून सांगलीकरांना उन्हाळी सुटीची खास भेट; सांगली, पुणे मार्गे हुबळी-अहमदाबाद विशेष गाड्या धावणार
By अविनाश कोळी | Published: April 23, 2024 04:07 PM2024-04-23T16:07:34+5:302024-04-23T16:07:45+5:30
सांगली : उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वेने सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी-अहमदाबाद या विशेष उन्हाळी गाडीला सांगलीत थांबा मंजूर केला ...
सांगली : उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वेनेसांगलीकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी-अहमदाबाद या विशेष उन्हाळी गाडीला सांगलीत थांबा मंजूर केला आहे. २८ एप्रिल ते २६ मे या कालावधीत दोन गाड्यांच्या एकूण दहा फेऱ्या होणार आहेत.
हुबळी-अहमदाबाद विषेश रेल्वे गाड्या सांगली रेल्वे स्थानकातून अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, बोईसर, मुंबई-कल्याण, मुंबई-वसई, लोणावळा तसेच पुणे जाण्यासाठी उपयुक्त आहेत, तसेच हुबळी, धारवाड लोंढा बेळगाव इत्यादी ठिकाणातून लोक सांगली रेल्वे स्थानकावर या गाड्यांनी येऊ शकतील.
अहमदाबाद-हुबळी विशेष रेल्वे गाड्या पकडून अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, बोईसर, मुंबई-कल्याण मुंबई-वसई, लोणावळा व पुणे येथून सांगली रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करू शकतील, तसेच सांगली स्थानकावरून घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड व हुबळीपर्यंत जाऊ शकतील.
प्रत्येक रविवारी धावणार गाडी
उन्हाळ्यातील सुट्यांसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हुबळी-अहमदाबाद दरम्यान सांगली, पुणे मार्गे विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
हुबळी-अहमदाबाद (गाडी क्र. ०७३११) या विषेश रेल्वे गाड्या २८ एप्रिल ते २६ मेपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री हुबळी येथून सुटून सांगली, पुणे मार्गे अहमदाबादला जातील.
अहमदाबाद-हुबळी प्रत्येक सोमवारी धावणार
अहमदाबाद-हुबळी (गाडी क्र. ०७३१२) ही विशेष एक्स्प्रेस २९ एप्रिल ते २७ मेदरम्यान प्रत्येक सोमवारी अहमदाबाद येथून सुटून पुणे, सांगलीमार्गे हुबळीला जाईल.