हुबळी-लोंढा-कॅसलरॉक एक्स्प्रेस आठ दिवस रद्द, रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 03:46 PM2022-11-21T15:46:34+5:302022-11-21T15:46:59+5:30
साप्ताहिक एक्स्प्रेस वळविण्यात आल्याने मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मिरज : दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी दि. २२ पासून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे हुबळी-मिरज, मिरज-लोंढा-मिरज व मिरज-कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस दि. २२ ते ३० नोव्हेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. मिरज-हुबळी एक्स्प्रेस दि. २२ नोव्हेंबर ते दि. २ डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे.
मेगाब्लॉकदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेगाड्या रद्द करण्याऐवजी त्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दि. २१ व २८ नोव्हेंबर रोजी धावणारी एर्नाकुलम-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस मडगाव, माजोर्डा, मदुरै, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळामार्गे धावणार आहे. त्याच दिवशी धावणारी हजरत निजामुद्दीन-म्हैसूर साप्ताहिक एक्स्प्रेस पुणे, दौंड, सोलापूर, होटगी, गदग, हुबळीमार्गे धावणार आहे. साप्ताहिक एक्स्प्रेस वळविण्यात आल्याने मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.