सांगलीत अंगणवाडी सेविकांची मानवी साखळी

By संतोष भिसे | Published: December 23, 2023 06:14 PM2023-12-23T18:14:00+5:302023-12-23T18:14:22+5:30

विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका संपावर

Human chain of Anganwadi workers in Sangli | सांगलीत अंगणवाडी सेविकांची मानवी साखळी

सांगलीत अंगणवाडी सेविकांची मानवी साखळी

सांगली : सांगलीत स्टेशन चौकात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शनिवारी मानवी साखळी तयार केली. मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आंदोलनात भाग घेतला.

विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका संपावर गेल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सांगली शाखेतर्फे आज मानवी साखळी तयार करण्यात आली. गणवेशातील कर्मचाऱ्यांनी सांगलीकरांचे लक्ष वेधून घेतले. घोषणा देत आपल्या मागण्यांचा जागर केला. मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला. स्टेशन चौकातील आंदोलनात मदतनीसही सहभागी झाल्या.

किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह शोभा कोल्हे, उज्वला वाघमारे, आशा माळी, रेहाना शेख, मुक्ता मोहिते, अरुणा नांगरे, उषा कांबळे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

Web Title: Human chain of Anganwadi workers in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली