व्यंकोचीवाडी, पायाप्पाचीवाडी येथे हुमणीमुक्त गाव अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:25+5:302021-06-06T04:19:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पायाप्पाचीवाडी व व्यंकोचीवाडी (ता. मिरज) येथे हुमणीमुक्त गाव अभियानाची सुरुवात करण्यात आली. कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पायाप्पाचीवाडी व व्यंकोचीवाडी (ता. मिरज) येथे हुमणीमुक्त गाव अभियानाची सुरुवात करण्यात आली. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हुमणीचा जीवनक्रम, होणारे नुकसान, नियंत्रणासाठीचे उपाय याची माहिती दिली. शेताच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिके दाखवली. प्रसिद्धीपत्रके, व्हॉट्सॲप ग्रुप याद्वारे जागृती केली जात आहे.
कृषी विभागाने हुमणी नियंत्रणासाठी ठिकठिकाणी दहा प्रकाश सापळे बसवले आहेत. शेतकऱ्यांनीही वर्गणी काढून ५० बकेट पद्धतीचे फेरोमेन सापळे बसवले आहेत. व्यंकोचीवाडी येथील खोत मळ्यात मंडल कृषी अधिकारी अलका आवटी, कृषी सहाय्यक विशाल सूर्यवंशी यांनी सापळ्याची प्रात्यक्षिके दाखवली. तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी उपाययोजना सुचवल्या. तसेच सापळ्यांचे प्रातिनिधीक वाटप केले. यावेळी तेजस, जाधव, गोरखनाथ निकम, अवधूत निंबाळे, आदी शेतकरी उपस्थित होते.