शिराळा तालुक्यात शेकडाे एकर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:03+5:302021-07-25T04:23:03+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू आलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे वारणा, मोरणा नदीला पूर आला आहे. हजारो ...

Hundreds of acres of farmland under water in Shirala taluka | शिराळा तालुक्यात शेकडाे एकर शेती पाण्याखाली

शिराळा तालुक्यात शेकडाे एकर शेती पाण्याखाली

Next

शिराळा : शिराळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू आलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे वारणा, मोरणा नदीला पूर आला आहे. हजारो एकर शेती व पिके पाण्याखाली गेली आहेत. वारणा नदीकाठावरील लोकांचे व जनावरांचे स्थलांतर सुरू आहे. सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

--------------

विराज नाईक यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

शिराळा : वारणा नदीकाठावरील देववाडी, मांगले, कांदे आणि सांगाव या ठिकाणी जाऊन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पहाणी केली. आमदार मानसिंगभाऊ यांनी प्रशासनाला योग्यत्या सूचना दिल्या असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. पुराचा धोका संभवणाऱ्या लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावांत परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावे. आवश्यकतेनुसार नागरिकांना मदत करावी, असे आवाहन केले.

Web Title: Hundreds of acres of farmland under water in Shirala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.