किसान रेल्वेची शंभरावी फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:48+5:302020-12-29T04:26:48+5:30
मिरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे सांगोला-शालीमार (पश्चिम बंगाल) या किसान रेल्वेच्या ...
मिरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे सांगोला-शालीमार (पश्चिम बंगाल) या किसान रेल्वेच्या शंभराव्या फेरीला झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही किसान रेल्वे सांगोल्यातून शालीमारकडे रवाना होणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल हे दिल्लीतून तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाक संजीव मित्तल हे मुंबईतून ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. देशातील शेतीमाल देशभरात पोहोचविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दिनांक ७ ऑगस्टपासून किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून दिनांक २१ नोव्हेंबरपासून सांगोला येथून किसान रेल्वे सुरू करण्यात आली होती. दिनांक २८ रोजी सांगोला येथून शालीमारकडे किसान रेल्वेची शंभरावी फेरी रवाना होणार आहे.