सांगली : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून करणाऱ्या पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:19 PM2022-06-21T14:19:14+5:302022-06-21T14:19:38+5:30

आरोपी संजयची पत्नी व मयत सखाराम जाधवर यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चिडून त्याने पत्नीची मदत घेत त्याच्या खुनाचा कट रचला होता. खोची बंधाऱ्याजवळ मृत सखाराम याला बोलावून घेत रोहित माळी याच्या मदतीने वार करून त्याचा खून करण्यात आला होता.

Husband and wife who kill a young man in an immoral relationship are sentenced to life imprisonment | सांगली : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून करणाऱ्या पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

सांगली : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून करणाऱ्या पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

सांगली : अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुंडके व धड वेगवेगळे करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पती-पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजय उद्धव जाधवर व उमा संजय जाधवर (दोघेही रा. काशीदवाडी, ता. केज, जि. बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी हा निकाल दिला.

खटल्याची माहिती अशी की, ९ मार्च २०१३ रोजी ही घटना उघडकीस आली होती. नरंदे (ता. हातकणंगले) येथील साखर कारखान्यावर मजूर म्हणून आरोपी आले होते. यावेळी आरोपी संजयची पत्नी व मयत सखाराम जाधवर यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चिडून त्याने पत्नीची मदत घेत त्याच्या खुनाचा कट रचला होता. खोची बंधाऱ्याजवळ मृत सखाराम याला बोलावून घेत रोहित माळी याच्या मदतीने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी संजय जाधवर याने सखारामचे मुंडके व धड वेगवेगळे करून खोची बंधाऱ्यात टाकून दिले होते. यातील धड तरंगत समडोळी येथे आले होते. त्यावेळी नदीजवळ मोटार चालू करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाला हे धड दिसून आले होते.

त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले हाेते. सरकार पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासण्यात आले. यात तपासकामी सागर पाटील व उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सबळ पुराव्याआधारे दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Husband and wife who kill a young man in an immoral relationship are sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.