Sangli: पत्नीला त्रास देणाऱ्या पतीस चोपले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By हणमंत पाटील | Published: May 23, 2024 05:28 PM2024-05-23T17:28:50+5:302024-05-23T17:29:22+5:30

सांगली : पत्नीस त्रास दिल्याचा गैरसमज करून पतीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी, तसेच दगडाने मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी ...

Husband beaten for harassing wife in Sangli, case registered against three  | Sangli: पत्नीला त्रास देणाऱ्या पतीस चोपले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

Sangli: पत्नीला त्रास देणाऱ्या पतीस चोपले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

सांगली : पत्नीस त्रास दिल्याचा गैरसमज करून पतीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी, तसेच दगडाने मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी जखमी पती विशाल बापू सोनवणे (वय २८, रा.माळी वस्ती, अभयनगर) याने कुमार सुरेश सरवदे, सुरेश बाळू सरवदे, शुभम विजय सरवदे (रा.रोपळे, ता.पंढरपूर) या तिघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल हा पत्नी शिवानी हिला त्रास देत असल्याचा गैरसमज माहेरच्या संशयितांना झाला. त्यामुळे संशयित कुमारने विशाल याच्या गचोटीला पकडून त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच संशयित सुरेश याने शिवीगाळ करत दगडाने विशालच्या हातावर मारून जखमी केले.

संशयित शुभम यानेही यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशालचे वडील त्याला सोडविण्यास आले असता, कुमार याने त्यांनाही दगडाने पाठीत मारून जखमी केले. जखमी विशाल याने उपचारानंतर संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Husband beaten for harassing wife in Sangli, case registered against three 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.