अण्णा भाऊ साठे यांचा विचार नव्या पिढीने जपला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:11+5:302021-09-08T04:32:11+5:30
कवठेएकंद : समाज पुढे येण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. अण्णा भाऊ साठे यांनी सर्व समाजासाठी काम केले. त्यांच्या नावाने उभारलेल्या ...
कवठेएकंद : समाज पुढे येण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. अण्णा भाऊ साठे यांनी सर्व समाजासाठी काम केले. त्यांच्या नावाने उभारलेल्या समाजमंदिराच्या माध्यमातून त्यांचे विचार पुढे न्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांनी केले.
कवठेएकंद (ता. मिरज) येथे अण्णा भाऊ साठे समाजमंदिराच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ग्रामपंचायतीने पाच गुंठे जागा उपलब्ध करून राज्य शासनाच्या २५/१५ निधीतून सभागृह उभारले आहे. या सभागृहाचे ‘अण्णा भाऊ साठे समाजमंदिर’ असे नामकरण व लोकार्पण सोहळा ज्येष्ठ विचारवंत बाबूराव गुरव, सरपंच राजेंद्र शिरोटे, प्रा. बाबूराव लगारे, पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी भास्करराव सदाकळे, दीपक जाधव, दीपक घोरपडे, रामचंद्र अवघडे, वासुदेव गुरव, विजयराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य, चंद्रकांत नागजे, प्रणित कांबळे, केशव थोरात, कविता माळी, विनोद लगारे, सूर्यकांत पाटील, नागसेन कांबळे, हारुण मुजावर आदी उपस्थित होते
पंडित अवघडे यांनी स्वागत केले. शामराव कांबळे, प्रशांत गेजगे, गणेश अवघडे, रवींद्र गेजगे, दादासाहेब गेजगे, जगन्नाथ अवघडे, महादेव गेजगे, पोपट अवघडे यांनी संयोजन केले.