बाजीराव पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:14+5:302021-02-24T04:29:14+5:30
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व बाजीराव पाटील समाज विकास ट्रस्टचे अध्यक्ष ...
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व बाजीराव पाटील समाज विकास ट्रस्टचे अध्यक्ष स्व. प्रकाश पाटील (दादा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शालेय विद्यार्थिनींना कोरे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. त्यावेळी कोरे बोलत होते.
काेरे म्हणाले, या परिसरातील मुलींना शिक्षणासाठी दहा-वीस किलोमीटर जावे लागत होते. बाजीराव पाटील यांनी ग्रामीण परिसरातील शिक्षणापासून एकही मुलगी वंचित राहू नये, यासाठी गावातच प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंतची शैक्षणिक सोय केली. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील मुलगी सुशिक्षित बनली. ऐतवडे खुर्द परिसरातील चार-सहा किलोमीटर अंतरावरील शेतात राहणाऱ्या कुटुंबातील मुली शालेय शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी या ट्रस्टच्या वतीने लाखो रुपये खर्च करून मुलींना सायकलींचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे. यापुढेही बाजीराव पाटील व प्रकाश पाटील यांच्या कार्याचा वारसा डोळ्यांसमोर ठेवून वारणा ग्रामविकास पतसंस्थेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी यापुढील काळातही येथील जनतेला दिलासा द्यावा.