गावाच्या गरजा ओळखून त्या सोडविण्याचे प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:50 AM2021-02-21T04:50:53+5:302021-02-21T04:50:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : गावाच्या गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुसाईवाडीत या पद्धतीने गावाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : गावाच्या गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुसाईवाडीत या पद्धतीने गावाची वाटचाल सुरू असल्याचा आनंद वाटला, असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे- पाटील यांनी केले.
ते कुसाईवाडी (ता. शिराळा) येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सरपंच विनोद पन्हाळकर, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, डॉ. दिनकर झाडे, डॉ. इंद्रजित यमगर यांची प्रमुख उपस्थिती होती. पेरे-पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीने गावांसाठी स्वच्छ पाणी पुरवठा योजना राबवावी. सांडपाणी व्यवस्था करावी. गावातील मोकळ्या जागेत फळझाडे लावली पाहिजेत. रस्ते, गाव परिसर स्वच्छ ठेवावा. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच गावातील निराधार लोकाच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. पैसा असेल तरच विकास होतो. हे चुकीचे आहे. गावचा विकास करताना सर्वांनी एकत्र आले पाहिजे. प्रत्येक माणसाने गावांसाठी, देशासाठी काही तरी योगदान दिले पाहिजे.
याप्रसंगी बिळाशी नवनिर्माणतर्फे भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार डॉ. दिनकर झाडे, डॉ. संध्या झाडे, आनंदा लोहार यांच्यासह बिळाशीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. काेरोना काळात विशेष योगदान देणाऱ्या डॉ. इंद्रजित यमगर, डॉ. गायत्री यमगर, अमोल देसाई, तानाजी पवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संध्या झाडे, डॉ. गायत्री यमगर, पोलीस पाटील भगवान येडगे, ग्रामसेवक एस. ए. पाटील, ग्रामपंचात सदस्य आनंदा भुरके, बाजीराव खोत, शेतकरी संघटनेचे देवेंद्र धस, आनंदा लोहार, रामचंद्र मुदगे, प्रतापराव शिंदे, सुनील पन्हाळकर, गोरख पवार, सचिन यादव, प्रदीप मुदगे, रोहित मुदगे, दीपक खोत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दीपक खोत यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब परीट यांनी स्वागत केले. सरपंच विनोद पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले, तर गोरख पवार यांनी आभार मानले.