लर्निंग लायसन्ससाठी अर्ज प्रलंबित राहिल्यास कार्यालयात संपर्क साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:09+5:302021-07-15T04:20:09+5:30
सांगली : परिवहन विभागाच्यावतीने लर्निंग लायसन्ससाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने जारी करण्यासाठीची सुविधा १४ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. ...
सांगली : परिवहन विभागाच्यावतीने लर्निंग लायसन्ससाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने जारी करण्यासाठीची सुविधा १४ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करताना अर्ज छाननी कारणासाठी प्रलंबित दिसतात. अशा अर्जदारांनी अर्जाची छाननी मोटार वाहन निरीक्षकांकडून करून घ्यावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी केले आहे.
--------------
आज तरुणांसाठी ऑनलाईन वेबिनार
सांगली : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त नोकरीसाठी इच्छुक तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती व मार्गदर्शन या विषयावर आज ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. युवक, युवतींनी सेमिनारच्या लिंकवर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
------------
पदोन्नती मिळालेल्या पोलिसांचा सत्कार
सांगली : पदोन्नती मिळालेल्या विश्रामबाग पाेलीस ठाण्यातील पोलिसांचा सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याहस्ते हा सत्कार झाला. यावेळी अतुल माने, सचिन कुंभार, अभिजित गायकवाड, अमोल भोळे, आयेशा मुजावर यांना हवालदारपदी पदोन्नतीबद्दल, तर सविता माळी यांचा नाईक पदावर पदोन्नती मिळाल्याने सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.
------------
दुधगावमधून ट्रॅक्टर लंपास
सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे अज्ञाताने दोन लाख ७५ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली लंपास केली. याप्रकरणी सनतकुमार बाबूराव आडमुठे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. सोमवार, दि. १२ जुलैरोजी रात्रीच्यासुमारास हा प्रकार घडला.