महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरलेत, अलमट्टीतून तीन लाखाने विसर्ग करा; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:21 PM2024-08-28T16:21:58+5:302024-08-28T16:22:32+5:30

कर्नाटक जलसंपदा विभागाकडून चुकीची माहिती

If the dams in Maharashtra are overflowing, discharge three lakhs from Almatti dam Demand of Krishna Flood Control Committee | महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरलेत, अलमट्टीतून तीन लाखाने विसर्ग करा; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरलेत, अलमट्टीतून तीन लाखाने विसर्ग करा; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

सांगली : वारणा, पंचगंगा व कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत. संपूर्ण धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून सध्या तीन लाख क्युसेकने विसर्ग सुरु करण्याची गरज आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी, जलसपंदा विभागाला कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे मागण्याचे निवेदन दिले आहे. तसेच हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुलेच ठेवावेत, अशी मागणीही पूर नियंत्रण समितीतर्फे शासनाकडे केली आहे.

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील व सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, सध्या राजापूर मधून ७३ हजार ८७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा वेदगंगा १९ हजार क्युसेक आणि घटप्रभा ३५ हजार क्युसेक विसर्ग असा सर्व मिळून अलमट्टीमध्ये १ हजार २८ हजार क्युसेक आवक आहे. सध्या अलमट्टी धरणातून १ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणाची उंची ५१९.४५ मीटर असून १२०.४१ टीएमसी पाणीसाठा अलमट्टी धरणात आहे. ९८ टक्के धरण भरलेले आहे. अलमट्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येऊनही त्यांनी ११९ मीटर पाण्याची लेवल आहे.

अलमट्टीतील पाणी कमी होताना दिसत नाही. सध्याच्या परिस्थितीत अलमट्टीने तीन लाख क्युसेक विसर्ग करणे फार जरुरीची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच धरणे ९० ते ९८ टक्के भरलेली असून त्यांनाही आता विसर्ग करणे क्रमप्राप्त आहे. नरसोबावाडी येथे तिसऱ्यांदा दक्षिणद्वार बंद झाले आहे. सांगली आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २२ फुटांवर गेली आहे. म्हणून अलमट्टी धरण व्यवस्थापनाने तीन लाख क्युसेकने विसर्ग सोडण्याची गरज आहे.

कर्नाटक जलसंपदा विभागाकडून चुकीची माहिती

अलमट्टीने पाणीपातळीमध्ये त्यांच्या अहवालात ९८ हजार क्युसेक आवक दाखवत आहेत. वास्तविक अलमट्टी धरणात सध्या १ हजार २७ हजार क्युसेक आवक होत आहे. ही बाब महाराष्ट्र प्रशासनाने गांभीर्याने तपासणी करुन अलमट्टी जलसंपदा विभागाचा चुकीचा अहवाल उजेडात आणण्याची गरज आहे, असेही सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले.

Web Title: If the dams in Maharashtra are overflowing, discharge three lakhs from Almatti dam Demand of Krishna Flood Control Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.