त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:01 PM2022-07-13T14:01:18+5:302022-07-13T14:03:21+5:30

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत

If they have Satbara then I have a Modification, Anil Babar warning to Jayant Patil | त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

Next

विटा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. ते एका मोठ्या नेत्यांचे चिरंजीव आहेत. गेल्या ३० वर्षांपासून माझे व त्यांचे संबंध आहेत. ते स्वत: मंत्री होते, त्यामुळे त्यांच्या तोंडून मंत्री, संत्री असे शब्द येणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत; पण त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी दिला.

येथे सोमवारी माजी मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना, ‘घाबरू नका, मंत्री, संत्री कोणीही होऊ द्या, माझ्याकडे सगळ्यांचा सातबारा आहे,’ असे जयंत पाटील बोलल्याचे आ. बाबर यांना माध्यमातून समजले. त्यावर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

आ. बाबर म्हणाले, जी पदे घटनेने दिली आहेत, ती मंत्रिपदे जयंत पाटील यांनी स्वत: भोगलेली आहेत. त्या पदाबद्दल ते या पध्दतीने बोलतील, असे मला वाटत नाही. सध्या त्यांच्या पक्षात काही नवीन विद्वान लोक आले आहेत. त्यांना सत्ता मिळावी, यासाठी त्यांनी जयंतरावांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनीच हे सर्व पसरविले आहे; परंतु मी कुजक्या मनोवृत्तीचा नाही. जयंतरावांसारख्या चांगल्या माणसाच्या तोंडी असे शब्द घालणे हे राजकीयदृष्ट्या शोभनीय नाही. त्यामुळे ज्यांनी हे केले, त्यांनी लक्षात ठेवावे, तुमच्याकडे माझा सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे.

स्वत:च्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने अशी निर्मिती सुरू आहे; परंतु असे करून निवडणूक जिंकता येत नाही. आता तुम्हाला लोकांनीच घरी पाठवायचे ठरविले असल्याचा टोला आ. बाबर यांनी विटा नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाला लगावला.

Web Title: If they have Satbara then I have a Modification, Anil Babar warning to Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली