खूषखबर: सांगली जिल्ह्यात येण्यासाठी मार्ग झाला खुला मात्र... आधी हे करावे लागेल तरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 04:20 PM2020-05-02T16:20:21+5:302020-05-02T16:26:54+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिल्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावयाची आहे. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा निश्चित मार्ग कालावधी नमूद करून देण्यात आलेला पास सोबत असणे बंधनकारक असणार आहे.

If you have to come to Sangli district, do the process | खूषखबर: सांगली जिल्ह्यात येण्यासाठी मार्ग झाला खुला मात्र... आधी हे करावे लागेल तरच!

खूषखबर: सांगली जिल्ह्यात येण्यासाठी मार्ग झाला खुला मात्र... आधी हे करावे लागेल तरच!

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात येण्यासाठी प्रवासाच्या परवानगीसाठीसंबंधित ठिकाणच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारकजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी-- प्रवास परवानगीच्या अर्जासाठी गुगल लिंकचा वापर करासांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी राहत असलेल्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज करावा

सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेलेमजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य कामासाठी अडकलेल्या व्यक्ती यांनी त्यांच्या स्वगृहीयेण्यासाठी, ते ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडेप्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी प्रक्रियेस होणाराविलंब टाळण्यासाठी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहनजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

प्रवासपरवानगीच्या अर्जासाठी गुगललिंकचा वापर करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेले मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य कामासाठी अडकलेल्या व्यक्ती यांनी या संदर्भात काही शंका असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरवध्वी क्रमांक 0233-2600500 व मो.क्र. 9370333932, 8208689681 या क्रमांकावर संबंधित व्यक्तींनी  संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1077 ची संपर्क सुविधा सद्यस्थितीत सांगलीजिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांकरीता उपलब्ध आहे. सदर प्रवासासाठी संबंधित जिल्हादंडाधिकारीयांचे ना हरकत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगलीजिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून परवानगी दिली जाईल.

या प्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. सदर तपासणी करण्यासाठी जिल्हा स्थलसीमा हद्दीवरील चेक पोस्टवर व आरोग्य पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रवाशांना सक्तीने 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल. सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित व्यक्तींनी ते राहत असलेल्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज करावा. या बाबत काही शंका असल्यास तहसील कार्यालयाच्या दूरध्वनी अथवा ई-मेलवर संपर्क साधावा. त्यानुसार शासन निर्णयामधील सर्व  कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून त्यांची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयास केली जाईल. सांगली

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवासासाठी परवानगी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांना पाठविण्यात येईल. संबंधित जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात
येईल. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिल्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावयाची आहे. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा निश्चित मार्ग कालावधी नमूद करून देण्यात आलेला पास सोबत असणे बंधनकारक असणार आहे.

तहसिल कार्यालयाचे नाव, ई-मेल व कंसात फोन नं. पुढीलप्रमाणे. मिरज -

  • mirajtahsildar@gmail.com (0233-2222682), तासगाव - tastahsildar@gmail.com

(02346-250630), कवठेमहांकाळ - kmtahsildar@gmail.com (02341-222039), वाळवा
- waltahsildar@gmail.com (02342-222250), शिराळा - shiralatahsil@gmail.com
(02345-272127), विटा - tahsildarvita@gmail.com (02347-272626), आटपाडी -
tahatpadi@gmail.com (02343-221624), कडेगाव -
tahasilkadegaon2347@gmail.com (02347-243122), पलूस -
tahsildarpalus@gmail.com (02346-226888), जत - jathtahsildar@gmail.com
(02344-246234).

  • या प्रमाणे देण्यात येणारी परवानगी ही जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या व या पुढे

वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना दिली जाणार नाही, असे
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
 

  • सांगली जिल्ह्यात येण्यासाठी प्रवास परवानगीच्या अर्जासाठी

https://sangli.nic.in/notice/for-filling-information-of-tourists-students-
pilgrims-workers-others-from-other-states-districts-to-return-to-sangli-
district/ या गुगल लिंकचा वापर करावा.
सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रवास परवानगीच्या अर्जासाठी
https://sangli.nic.in/notice/regarding-filling-information-for-tourists-
students-pilgrims-workers-others-to-travel-from-sangli-district-to-other-
states-districts/ या गुगल लिंकचा वापर करावा.
00000

 

 

Web Title: If you have to come to Sangli district, do the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.