ऊसतोडीसाठी पैसे घेतल्यास बिलातून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:15+5:302021-03-05T04:27:15+5:30

शिरटे : ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. ऊस तोडीसाठी पैसे घेतल्याची शेतकऱ्यांची तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदार, मुकादम किंवा ...

If you take money for ustodi, it is recovered from the bill | ऊसतोडीसाठी पैसे घेतल्यास बिलातून वसुली

ऊसतोडीसाठी पैसे घेतल्यास बिलातून वसुली

Next

शिरटे : ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. ऊस तोडीसाठी पैसे घेतल्याची शेतकऱ्यांची तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदार, मुकादम किंवा मजुरांच्या बिलातून वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतला असल्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी सांगितले.

यावर्षी कोरोनाचे संकट, तोडणी यंत्रणेची कमतरता व जादा ऊस क्षेत्र यामुळे ऊस लवकरात लवकर कारखान्याकडे पाठविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यातच कोरोनाच्या सावटामुळे तोडीअभावी शेतात ऊस राहू नये याची काळजी शेतकऱ्यांना आहे. नेमका याचाच फायदा उठवत तोडणी कंत्राटदार, मुकादम व मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडीसाठी पैसे घेतल्याची तक्रार कारखान्याकडे केल्यास त्यांची योग्य चौकशी करून, ते पैसे संबंधित कंत्राटदार, मुकादम किंवा मजुरांच्या बिलातून वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. तसा निर्णय कृष्णा कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. कारखान्याच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत होत असून, तक्रारीसाठी कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी संचालक दळवी यांनी केले आहे.

Web Title: If you take money for ustodi, it is recovered from the bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.