आष्ट्यात पाणी गळतीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:42+5:302021-05-05T04:44:42+5:30
अवैध दारूविक्रीवर कारवाईची गरज जत : जत तालुक्यात अनेक भागांत अवैध दारूविक्री केली जाते. यातून व्यसनाधीनता व गुन्हेगारी वाढत ...
अवैध दारूविक्रीवर कारवाईची गरज
जत : जत तालुक्यात अनेक भागांत अवैध दारूविक्री केली जाते. यातून व्यसनाधीनता व गुन्हेगारी वाढत आहे. यामुळे याबाबत कठोर कारवाईची गरज आहे. पोलीस प्रशासनाने या घटनांवर नियंत्रण आणून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे.
करगणीत स्वच्छतेची मागणी
करगणी : करगणी ( ता. आटपाडी) येथे कोरोनाचे संकट वाढत आहे. यामुळे प्रशासनाने स्वच्छतेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सर्व ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
अल्पवयीन चालकांवर कारवाई नाही
कुपवाड : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
खुल्या जागा स्वच्छ करण्याची मागणी
मिरज : शहरातील अनेक भागात खुले भूखंड आहेत. मात्र, काही मोजक्याच भूखंडांना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. महापालिका प्रशासनाने शहरातील अशा भूखंडांच्या स्वच्छतेबाबत संबंधितांना सूचना देणे गरजेचे आहे. सध्या कोरोनासह विविध आजारांचा धोका असल्याने याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. तशा सूचनाही संबंधितांना द्याव्यात.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
टाकळी : मिरज ते म्हैसाळ रस्त्यावर मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात कुत्र्यांचा संचार वाढला. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
मोकळ्या जागांचा विकास करा
शिराळा : नगरपंचायत प्रशासनाने शहरातील मोकळ्या जागेचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. काही ठिकाणी खेळण्याचे साहित्य लावून विकास केल्यास मुलांना त्याचा फायदा होणार आहे. शहरातील मोकळ्या जागांचा विकास केल्यास त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.