आसंगी तुर्क येथे बेकायदेशीर बिअरसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:19 AM2020-12-27T04:19:50+5:302020-12-27T04:19:50+5:30
सांगली : आसंगी तुर्क (ता. जत) येथे बेकायदेशीरपणे बिअरचा साठा करून विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक ...
सांगली : आसंगी तुर्क (ता. जत) येथे बेकायदेशीरपणे बिअरचा साठा करून विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. मीरासाहेब मोदीन मुजावर (वय २८) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक लाख ८० हजारांचा बिअरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी पथक तयार केले असून, ते पथक शनिवारी जत तालुक्यात गस्तीवर होते. यावेळी आसंगी तुर्क येथे एकजण घराशेजारी बसून बिअरची विक्री करत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून मुजावर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ८० हजार रुपये किमतीची ७५ बॉक्स बिअर जप्त करण्यात आली व उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, जितेंद्र जाधव, राहुल जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.