तासगाव तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खननाचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:36 AM2021-02-27T04:36:15+5:302021-02-27T04:36:15+5:30
मंडल अधिकारी कबीर सूर्यवंशी, तलाठी प्रवीण जाधव, सुधाकर कुणके, मनीष राऊत, रमेश कावरे यांच्या पथकाने मणेराजुरी येथील विजय ...
मंडल अधिकारी कबीर सूर्यवंशी, तलाठी प्रवीण जाधव, सुधाकर कुणके, मनीष राऊत, रमेश कावरे यांच्या पथकाने मणेराजुरी येथील विजय शिवाजी पवार, योगेवाडी येथील युवराज हुलवाणी तसेच वज्रचौंडे येथील संजय पाटील आणि सुरेश साखरे यांच्या शिवसमर्थ स्टोन क्रशरवरील उत्खननाचे पंचनामे करायला सुरुवात केली आहे.
मंडल अधिकारी बी.एस नागरगोजे, तलाठी सुहास औताडे, सचिन पाटील, वैभव पाटील व पोपट ओमासे यांच्या पथकाने ढवळी, विसापूर येथील तसेच सुभाष पाटील यांचे होनाई मेटल्स यांच्यासह संजय पाटील आणि जयकुमार माने यांच्या उत्खननाचे पंचनामे सुरू केले आहेत.
मंडल अधिकारी दत्तात्रय मोटे, तलाठी दीपक वायदंडे, महावीर ससाणे, गणेश गायकवाड, प्रकाश पांढरे यांच्या पथकाने मांजर्डे, बस्तवडे आणि सावळज येथील स्टोन क्रशरधारकांनी केलेल्या उत्खननाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे, तलाठी विक्रम कांबळे, श्रीपतराव पाटील, राम कोळी व भगवान सकपाळ यांच्या पथकाने मणेराजुरी येथील सचिन पाटील यांचे शिवदत्त इन्फ्रास्ट्रक्चर, पैगंबर मुजावर (राहुल बिल्डकाॅन) यांचे स्टोन क्रशर, सुजाता चौगुले यांचे भवानी माता स्टोन क्रशर यांच्यासह अजय शिवाजी जाधव आणि उदय गायकवाड यांनी केलेल्या उत्खननाचे पंचनामे सुरू केले आहेत.
चौकट
चौकशीसाठी बाहेरील अधिकारी
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की पंचनामे करताना गौण खनिज उत्खनन झालेल्या ठिकाणाचे विद्यमान मंडल अधिकारी आणि तलाठी यांना नेमण्यात येऊ नये. यामुळे पंचनामे करण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्यातील एक तर मिरज तालुक्यातील तीन पथके नेमण्यात आली आहेत. पंचनामे ई.टी.एस. पद्धत आणि ड्रोनद्वारे सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहेत.