खासगी ट्रॅव्हल्सचे बेकायदा थांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:38+5:302021-06-24T04:19:38+5:30
एका पावसात रस्ता खड्डेमय सांगली : वसंतदादा कारखान्यासमोरील रस्ता एका पावसात खड्डेमय बनला आहे. कारखान्यापासून लक्ष्मीनगर चौकापर्यंत व दक्षिणेला ...
एका पावसात रस्ता खड्डेमय
सांगली : वसंतदादा कारखान्यासमोरील रस्ता एका पावसात खड्डेमय बनला आहे. कारखान्यापासून लक्ष्मीनगर चौकापर्यंत व दक्षिणेला संपत चौकापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. ठेकेदाराकडून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
विजयनगरमधील रेल्वे पुलाखाली तलाव
सांगली : विजयनगर चौकातून विनायकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली पावसाळी पाण्याचा तलाव निर्माण झाला आहे. परिसरातील पाणी चोहोबाजुंनी या पुलाखाली येत असल्याने त्याचा लवकर निचरा होत नाही. पावसाने उघडिप दिल्यानंतरही अद्याप याठिकाणी पाणी साचून आहे. त्यामुळे येथील पावसाळी पाणी निचऱ्याची व्यवस्था कायमस्वरुपी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट
जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ
सांगली : जिल्ह्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. बुधवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३२, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे नागरिकांना काहीअंशी उकाडा जाणवत आहे. येत्या दोन दिवसात कमाल तापमानात अंशाने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.