जगदीश पाटील यांच्या प्रतिमेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:54+5:302021-03-10T04:26:54+5:30
फोटो -०९०३२०२१-आयएसएलएम-कामेरी न्यूज कृषिभूषण जगदीश पाटील यांच्या प्रतिमा अनावरणप्रसंगी तानाजी माने, संग्राम पाटील, दाऊद तानेखान, सूर्याजी पाटील. लोकमत ...
फोटो -०९०३२०२१-आयएसएलएम-कामेरी न्यूज
कृषिभूषण जगदीश पाटील यांच्या प्रतिमा अनावरणप्रसंगी तानाजी माने, संग्राम पाटील, दाऊद तानेखान, सूर्याजी पाटील.
लोकमत न्यूज नेटवर्क :
कामेरी : कृषिभूषण जगदीश पाटील यांनी कामेरी येथे राजारामबापू सोसायटी स्थापन करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अतिशय चांगले काम केले. सर्व पदाधिकारी व सभासद यांना त्यांची नेहमी आठवण राहावी म्हणून त्यांच्या प्रतिमेचे अनावरण गरजेचे होते, असे मत कामेरीचे माजी उपसरपंच तानाजी माने यांनी व्यक्त केले.
संग्राम जगदीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सोसायटीमार्फत पूरग्रस्त व कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा आवर्जून उल्लेख संग्राम पाटील यांनी केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निवास माने, उपाध्यक्ष सूर्याजी पाटील, संचालक विकास पाटील, जयसिंग पाटील, जमाल मुल्ला, राजेंद्र निंबाळकर, पोपट कदम, सुधीर आढाव, मालन पाटील व सभासद उपस्थित होते. धनाजी पवार यांनी सूत्रसंचालन केले. अच्युतराव लोहार यांनी प्रास्ताविक केले. अनिल धनवडे यांनी स्वागत केले. सर्जेराव पाटील यांनी आभार मानले.