पंचनामे होताच तत्काळ मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:53+5:302021-07-31T04:26:53+5:30

फोटो ओळ: औदुंबर (ता. पलूस) येथे दत्त मंदिरातील अग्निशामकच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार अरुण ...

Immediate distribution of aid as soon as the panchnama is held | पंचनामे होताच तत्काळ मदत वाटप

पंचनामे होताच तत्काळ मदत वाटप

Next

फोटो ओळ: औदुंबर (ता. पलूस) येथे दत्त मंदिरातील अग्निशामकच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार अरुण लाड, शरद लाड आदी उपस्थित होेते.

अंकलखोप : पूरबाधित क्षेत्रासाठी एनडीआरएफच्या नियमानुसार किंवा त्यापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा विचार आहे. या मदतीचे वाटप पंचनाम्यानंतर लवकरच सुरू होईल, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.

पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा शुक्रवारी आमदर रोहित पवार यांनी दाैरा केला. यावेळी त्यांनी औदुंबर येथे पाहणी केली. येथील दत्त मंदिर परिसरात आमदार अरुण लाड आणि क्रांती उद्योग समूहामार्फत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पवार यांनी पाहणी केली.

आमदार पवार म्हणाले, ‘‘क्रांती उद्योग समूहाने पूर पट्ट्यात सुविधा देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. वैद्यकीय सुविधा, जेवण, राहण्याची सोय, जनावरांच्या चाऱ्याची सोय करून त्यांनी ‘क्रांती’चा वारसा अतिशय चांगल्या प्रकारे जोपासला आहे.’’

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मोहन पाटील, जिल्हा परिषद नितीन नवले, पूजा लाड, नंदा पाटील, सरपंच अनिल विभूते, उपसरपंच स्वाती पाटील, मृणाल पाटील, उदय पाटील, घनश्याम सूर्यवंशी, धनंजय पाटील, क्रांतीचे उपाध्यक्ष उमेश जोशी उपस्थित होते.

Web Title: Immediate distribution of aid as soon as the panchnama is held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.