जिजामाता सोसायटीवरील आरक्षण रद्दचा ठराव त्वरित संमत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:48+5:302020-12-16T04:40:48+5:30

कुपवाड : महापालिका प्रभाग क्रमांक आठमधील वारणाली येथील जिजामाता गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवासी क्षेत्रावरील आरक्षण रद्द करण्याबाबतचा ठराव प्रतिनिधींनी त्वरित ...

Immediately approve the resolution to cancel the reservation on Jijamata Society | जिजामाता सोसायटीवरील आरक्षण रद्दचा ठराव त्वरित संमत करा

जिजामाता सोसायटीवरील आरक्षण रद्दचा ठराव त्वरित संमत करा

Next

कुपवाड : महापालिका प्रभाग क्रमांक आठमधील वारणाली येथील जिजामाता गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवासी क्षेत्रावरील आरक्षण रद्द करण्याबाबतचा ठराव प्रतिनिधींनी त्वरित संमत करावा, अशी मागणी मंगळवारी सोसायटीचे अध्यक्ष विशाल मोरे यांच्यासह नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली.

वारणालीतील जिजामाता गृहनिर्माण सोसायटीची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली. पुढे सात वर्षांनी म्हणजेच १९८७ मध्ये संस्था नोंदणीकृत झाली. परिसरात नागरी वस्तीचा विस्तार वाढला. महापालिकेच्या २००५ च्या आराखड्यादरम्यान संस्थेतील २६ गुंठे जागेवर आरक्षण पडले. यामध्ये सुमारे २७ घरे बाधित झाली. आरक्षण उठविण्यासाठी नागरिकांचा लढा वर्षानुवर्षे सुरू होता. बऱ्याच कालावधीनंतर आरक्षण उठविण्याबाबतचा विषय १७ डिसेंबर रोजीच्या महासभेतील अजेंड्यावर आला असता, सर्वपक्षीय कृती समितीच्या दणक्याने विषय गंभीर बनला आहे.

सोसायटीचे अध्यक्ष विशाल मोरे म्हणाले, जिजामाता सोसायटीवर टाकण्यात आलेले आरक्षण उठविण्याबाबतचा लढा वर्षानुवर्षे सुरू आहे. बऱ्याच काळानंतर १७ डिसेंबर रोजी प्रभागाच्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या महासभेत हा विषय अजेंड्यावर आला आहे. कृती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी याची नाराजी व्यक्त केली. आमची सोसायटी नोंदणीकृत आहे. ग्रामपंचायतीपासूनचे सर्व कर आम्ही भरतो. मग आरक्षण का उठवले जात नाही? ठरावाला कोण विरोध करत आहे? महासभेतील आलेल्या ठरावाला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा द्यावा. सोसायटीवरील आरक्षण त्वरित उठवावे.

यावेळी सचिव अजय पवार, उपाध्यक्ष जयश्री पाटील, नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, महेश सागरे, संचालक गणपती मगदूम, रामचंद्र साळुंखे, महेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Immediately approve the resolution to cancel the reservation on Jijamata Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.