‘रीनैसंस द स्टेट’ पुस्तकावर तत्काळ बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:36+5:302021-05-25T04:29:36+5:30
संख : ‘रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज, सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. या पुस्तकावर ...
संख : ‘रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज, सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी सहन करणार नाही.
या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाने ताब्यात घ्यावीत.
जोपर्यंत हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत.