पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:11+5:302021-04-29T04:20:11+5:30
लाड यांनी बुधवारी पलूस तालुक्यातील दुधोंडी, नागराळे, पुणदी, दुधोंडी, पुणदीवाडी येथील पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून पिकाबाबत ...
लाड यांनी बुधवारी पलूस तालुक्यातील दुधोंडी, नागराळे, पुणदी, दुधोंडी, पुणदीवाडी येथील पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून पिकाबाबत माहिती घेतली आणि हातातोंडाला आलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, असे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले.
तालुक्यात उसाबरोबरच फळशेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. ऊस, कलिंगड, पपई, द्राक्ष अशी अनेक प्रकारची शेतीचे नुकसान या पावसामुळे झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांना दिलासा देऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन लाड यांनी दिले.
यावेळी उपसभापती अरुण पवार, गुत्तांना बाबर, दिलीप पाटील, नंदाताई पाटील (नागराळे), संभाजी साळुंखे, विनायक महाडिक, विजय साळुंखे, हौसेराव गायकवाड, संभाजी पाटील, अभिजित गायकवाड, सतीश जाधव, अरुणा जाधव, दिलीप जाधव, (पुणदीवडी), कृषी साहाय्यक इंद्रजित चव्हाण उपस्थित हाेते.
फाेटाे : २८ पलुस १
ओळ : पुणदी (ता. पलूस) येथील नुकसानग्रस्त पपई पिकाची आमदार अरुण लाड यांनी पाहणी केली.