सांगली शहरात आज साध्या पद्धतीने पंजांचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:56+5:302021-08-20T04:30:56+5:30
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारा मोहरम हा सण शहरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. गावभाग येथील हिंदू शिकलगार मंडळ, शिवाजी ...
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारा मोहरम हा सण शहरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. गावभाग येथील हिंदू शिकलगार मंडळ, शिवाजी तालीम संस्था, पेठभाग परिसरातील बालाजी चौकातील शहीद ए करबला मंडळ, बदाम चौक येथील मटण मार्केट परिसर, खणभाग व नळभाग, तसेच आंबेडकर रोड येथील हिंदू-शिकलगार मंडळ आदी मंडळांबरोबरच शहरातील व आसपासच्या भागातील सुमारे १०० हून अधिक असणाऱ्या मोहरम मंडळांमध्ये ताबूत, पंजे यांची स्थापना झाली आहे.
भेटीगाठी साध्या पद्धतीने झाल्या. गुरूवारी रात्री कत्तल रात्र झाली. शुक्रवारी विसर्जन होणार आहे. यंदा मिरवणुका न काढता साध्या पद्धतीने होणार आहे. खोजा कॉलनी येथील खोजा समाज बांधवांच्यावतीने शहरातून मोठी शोकयात्रा काढण्यात येते. पण यंदाही कोरोनामुळे या समाजाच्यावतीने साध्या पद्धतीने विसर्जन होणार असल्याचे सांगण्यात आले.