मिरज तालुक्यात कडक उपाययोजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:49+5:302021-04-15T04:25:49+5:30
मिरज तालुक्यातील सर्व गावातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीसपाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आरोग्य कर्मचारी, ...
मिरज तालुक्यातील सर्व गावातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीसपाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मिरज पंचायत समितीमध्ये बैठक घेतली. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी सर्वांशी संवाद साधून उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले.
तालुका आरोग्य अधिकारी विजयकुमार सावंत यांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा सादर केला. तालुक्यात एकूण ४६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. लसीकरण मोहिमेसाठी आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक ग्रामीण रुग्णालय, १७ उपकेंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले आहे. यासाठी आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, सेवकांची नेमणूक केली आहे. ४५ ते ६० वयोगटातील असे एकूण एक लाख पाच हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ३० हजार १४४ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
चाैकट -
नियम पाळा
कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा. लाॅकडाऊन कालावधीत नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दक्षतेने जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी केले.