स्फूर्तिदायक इतिहासाचे स्मरण महत्त्वाचे--चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:21 AM2017-09-22T00:21:18+5:302017-09-22T00:48:10+5:30

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्

 Important to remember inspirational history - Chandrakant Dada Patil | स्फूर्तिदायक इतिहासाचे स्मरण महत्त्वाचे--चंद्रकांतदादा पाटील

स्फूर्तिदायक इतिहासाचे स्मरण महत्त्वाचे--चंद्रकांतदादा पाटील

Next
ठळक मुद्दे विल्सन पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने स्मरण ठेवून त्या घटनेला पुन्हा उजाळा दिला.आम्हाला त्रास दिला नसता तर कोल्हापूरकरांवरील टोल हटला नसता, असेही त्यांनी कबुली दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी काढले. ‘विल्सन नोज कट’ अर्थात विल्सन पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या घटनेत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सन १९४२च्या ‘चले जाव’च्या लढ्यात पुरुषांबरोबर हिरिरीने भाग घेऊन स्वातंत्र्यसौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी मातीच्या भांड्यातून लपवून आणलेले डांबर विल्सनच्या पुतळ्यावर टाकून तो पूर्ण विद्रूप केला. पुढे स्वातंत्र्यसेनानी दत्तोबा तांबट, शंकरराव माने, डॉ. माधवराव कुलकर्णी, निवृत्ती आडूरकर, सिदलिंग हाविरे, शामराव पाटील, नारायणराव घोरपडे, नारायणराव जगताप, पैलवान माधवराव घाटगे, काका देसाई, कुंडलिक देसाई, पांडुरंग पोवार, अहमद शाबाजी मुल्ला, व्यंकटेश देशपांडे यांनी पुतळ्यावर घण घालून फोडला आणि हा इतिहास आजरामर झाला. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने स्मरण ठेवून त्या घटनेला पुन्हा उजाळा दिला. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व संघटनेचे आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. शरद तांबट यांनी स्वागत केले.

यावेळी महापौर हसिना फरास, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर अर्जुन माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, डॉ. संदीप नेजदार, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंत मुळीक, नगरसेवक अशोक जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल घाटगे, महादेव पाटील आदी उपस्थित होते.


....तर टोल हटला नसता
भाषणादरम्यान माजी महापौर आर. के. पोवार यांच्याकडे पाहत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टोलविरोधी आंदोलन, पंचगंगा पूल आंदोलनाचे बीज कुठून आले हे समजले, असा टोला हाणला. त्यांनी जर चळवळ उभारली नसती व आम्हाला त्रास दिला नसता तर कोल्हापूरकरांवरील टोल हटला नसता, असेही त्यांनी कबुली दिली. हा त्रास नसून आमच कामच आहे, असेही ते पुढे म्हणाले.
आठवण जागीविद्रूपीकरणाच्या आंदोलनातील स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र डॉ. निशीकांत तांबट हे त्या आंदोलनाच्यावेळी ६ वर्षांचे होते. तेही भागीरथीबार्इंच्या-बरोबर तुरूंगात होते.ही आठवण ठेवून उत्तराधिकारी संघटनेने डॉ. निशीकांत तांबट यांच्या हस्ते गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास त्यांना खास बोलाविले होते. तांबट यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरीने पुष्पहार अर्पण केला.

पाठ्यपुस्तकात  धडा घ्या
‘विल्सन नोज कट’ या पुतळा विद्रूपीकरणाच्या ऐतिहासिक घटनेवर पाठ्यपुस्तकात धडा घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने त्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे शरद तांबट यांनी केली होती. यास उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात हा धडा घेण्यासाठी प्रयत्न करू. तत्पूर्वी ५० ते ६० पानांचे पुस्तक काढू व त्याच्या दहा हजार प्रतींची मी स्वत: छपाई करून देतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोल्हापुरातील शिवाजी चौकात गुरुवारी सकाळी ‘विल्सन नोज कट’ अर्थात विल्सनचा पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या घटनेत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, डॉ. निशिकांत तांबट, शरद तांबट, महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय देवणे, बाबा पार्टे, डॉ. संदीप नेजदार, वसंत मुळीक, नगरसेवक अशोक जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title:  Important to remember inspirational history - Chandrakant Dada Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.