फटाके गोदामांवर छापे; साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:09 AM2017-10-18T04:09:01+5:302017-10-18T04:09:31+5:30
विनापरवाना आणि लोकवस्तीत फटक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील...
सांगली : विनापरवाना आणि लोकवस्तीत फटक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरले. सांगलीत हरिपूर रस्त्यावर छापा टाकून त्यांनी सुमारे चार लाखांचा फटक्यांचा साठा त्यांनी जप्त केला. सांगलीच्या कारवाईनंतर मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा व शिराळा तालुक्यात रात्री उशिरापर्यंत छापासत्र सुरू होते. बुधगाव व कवलापूर (ता. मिरज) येथेही फटाके स्टॉलवर छापा टाकून एक लाखाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
निवासी भागात फटाके विक्रीस उच्च न्यायालयाने मनाई केली आहे़ हे आदेश आल्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई सुरू केली़ काही ठिकाणी या कारवाईला विरोधही झाला़ सोशल मिडियावर या कारवाईसंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत़