पोस्ट ऑफिस कार्यालयाचे कामकाज सुधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:12+5:302021-03-27T04:27:12+5:30
पोस्ट खात्याच्या कामकाजाबाबत विशाल सूर्यवंशी यांनी पोस्टमास्तर अरुण लोखंडे यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकमत न्यूज ...
पोस्ट खात्याच्या कामकाजाबाबत विशाल सूर्यवंशी यांनी पोस्टमास्तर अरुण लोखंडे यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रवादीकडून नवीन आधारकार्ड, दुरुस्ती शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची आधारकार्ड पोस्ट खात्याने वेळेत पोहोच केली नाहीत. बरीच कार्ड दहा-दहा दिवस पोस्टातच पडून राहिल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे पोस्ट कार्यालयाने आपले कामकाज सुधारावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सरचिटणीस विशाल सूर्यवंशी यांनी केली आहे.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथे नवीन आधारकार्ड, दुरुस्ती शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. ज्यांनी आधारकार्ड काढले त्यांचे आधारकार्ड पोस्टात येऊन पडले. परंतु, तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळेत पोहोचवले नाही. या त्यांच्या दिरंगाईबद्दल नागरिकांमधून संतापाची लाट उसळली होती. त्याच्या तक्रारीही राष्ट्रवादीकडे करण्यात आल्या. याची दखलही राष्ट्रवादी पक्षाने घेतली आहे. या तक्रारींचे निवेदन इस्लामपूरचे पोस्टमास्तर अरुण लोखंडे यांना देण्यात आले. या कारभारामध्ये सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.
यावेळी प्रवीण पाटील, संतोष चव्हाण, लखन पवार, रवींद्र वाघमोडे, सौरभ जाधव, गंगाराम शिंगाडे, अशोक पाटील, मिलिंद पाटील, विक्रांत ताटे, प्रल्हाद माळी, राजीव पाटील उपस्थित होते.