सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम; आंदोलनाच्या ठिकाणी वाहनांच्या रांगा, मोठा पोलिस बंदोबस्त

By संतोष भिसे | Published: November 19, 2023 05:25 PM2023-11-19T17:25:23+5:302023-11-19T17:25:44+5:30

दोन दिवसांत एफआरपी द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे.

in Sangli district Queues of vehicles, heavy police presence at protest sites | सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम; आंदोलनाच्या ठिकाणी वाहनांच्या रांगा, मोठा पोलिस बंदोबस्त

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम; आंदोलनाच्या ठिकाणी वाहनांच्या रांगा, मोठा पोलिस बंदोबस्त

सांगली: दोन दिवसांत एफआरपी द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे. त्यानुसार रविवारी सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे आंदोलनस्थळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये आणि पहिली उचल साडेतीन हजार रुपये देण्याचा मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने रविवारी इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा परिसरात चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बसमधून प्रवास करणाऱ्या अनेकांना खाली उतरून पायपीट करावी लागली.

शिराळा येथील बाह्यवळण रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास आंदाेलन सुरू होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. शिगाव (ता. वाळवा) येथे सकाळी अकराच्या सुमारास मराठी शाळेनजीक राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. येथेही दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही चक्काजाम आंदोलन झाले. आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता.

Web Title: in Sangli district Queues of vehicles, heavy police presence at protest sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.